प्रिय मित्रानो,
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अभ्यासानुसार, 15-49 वर्षे वयोगटातील तरुण लोकसंख्येमध्ये मद्यपान हा मृत्यू आणि अपंगत्वाचा सर्वात मोठा धोकादायक घटक आहे. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये तंबाखूमुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण मृत्यूंपैकी २१% मृत्यूंसाठी तंबाखू कारणीभूत ठरते. पुरुषांमधील अकाली मृत्यूच्या कारणांमध्ये दारूचा आठवा क्रमांक लागतो.
हा जोखमीचा घटक आपल्या समाजात वेगाने वाढत आहे. एकदा का दारू आपल्या जीवनशैलीत घट्ट रुजली की मग सांस्कृतिक प्रवृत्ती उलटणे कठीण होईल. आपल्या सर्वांसाठी कृती करण्याची ही एक नाजूक आणि महत्वाची वेळ आहे.
तुम्ही या मोहिमेत पुढील प्रकारे योगदान देऊ शकता:
-
मोहिमेतील ऑडिओ आणि व्हिडिओचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसार करा.
-
भूमिका घ्या: आपल्या मित्रमैत्रिणींवर प्रभाव टाकण्याची ताकद आपल्यात असते. किंबहुना दारूचे सेवनसुद्धा सहसा अशाच एखाद्या मित्राच्या प्रभावाने सुरु होते. त्यामुळे तुम्हालासुद्धा वाटत असेल की दारू पिणे वाईट आहे किंवा योग्य निवड नाही तर याबाबत मित्रांशी चर्चा करा. दारूबद्दल तुमचे मत तुमच्या मित्रांना सांगा व आनंद घेण्याच्या चांगल्या मार्गांवर चर्चा करा.
-
देणगी: दारू किंवा तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी आम्हाला संपर्क करणाऱ्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्यासाठी आम्ही एका समुपदेशकाला पूर्णवेळ सेवेत घेण्याचे नियोजन करत आहोत. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जावून दारू व तंबाखू विषयी जागृती करणाऱ्यांची संख्या वाढवायचा विचार आहे. या कामात आर्थिक योगदान देऊन आमची ताकद वाढवावी ही विनंती.
आमच्या बँक खात्याचे तपशील:
Ugravedan Foundation
IDFC First Bank
Account No: 10079978687
IFSC code: IDFB0040115
Savings Account
UPI Handle: UVF.03@cmsidfc
QR कोड
देणगी रक्कम आमच्या खात्यात जमा केल्यानंतर हा गुगल फॉर्म भरावा, जेणेकरून आम्ही तुम्हाला पावती पाठवू शकू.
-
दारू पिणे थांबवा: दारू पीत असाल तर आजपासून दारू न पिण्याचे वचन घ्या. यासाठी आम्ही तुमची मदत करू
-
अनुभव सांगा: तरुणांना दारू उद्योग-प्रायोजित टीव्ही जाहिराती, लघुपट, होर्डिंग इ. दिवसातून अनेक वेळा दाखवल्या जातात, दारू पिल्याने आनंद आणि यश मिळते असे संदेश थोपवले जातात. दारूच्या व्यसनात अडकल्यानंतर लोकांना त्रास सहन करावा लागतो, हे व्यसनात गुरफटल्यानंतरच लक्षात येते. तरुणांसमोर दारूचे खरे चित्र उभे करण्यासाठी, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला दारूबाबत आलेले अनुभव आमच्यासोबत शेअर करावेत. व्यसनात अडकलेल्या लोकांकडून, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून, डॉक्टरांकडून किंवा कोणत्याही संबंधित नागरिकाकडून, ज्यांनी दारूचे दुष्परिणाम जवळून पाहिले आहेत, त्यांच्याकडून शेअर करण्याचे आम्ही स्वागत करतो. कृपया poisonswelove@gmail.com वर एक छोटा व्हिडिओ किंवा लिखित संदेश पाठवा आम्ही या वेबसाइटवर आणि आमच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे त्याची प्रसिद्धी करू.
-
शिक्षक व शाळांचा सहभाग: जर तुम्ही एखाद्या शैक्षणिक संस्थेशी संबंधित असाल तर तुम्ही वर्गादरम्यान यापैकी काही लहान ऑडिओ कथा/व्हिडिओ प्ले करू शकता आणि विद्यार्थ्यांना अधिक सामग्रीसाठी आमची वेबसाइट पाहण्यासाठी प्रोत्साहित करू शकता. किंवा कदाचित तुम्ही त्यांना प्रार्थनेच्या वेळेत किंवा शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे मोहिमेबद्दल माहिती देऊ शकता. विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे चार ते आठ महिने वेगवेगळी माहिती शेअर करू शकता. अशाप्रकारच्या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना समवयस्कांचा दबाव सहजपणे हाताळता येईल. अशा शाळांमध्ये आम्हाला एक दिवसाची कार्यशाळा घ्यायला सुद्धा आवडेल.
-
मदत: तुमच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही संस्थेच्या सदस्यांसाठी आम्ही दारूच्या महामारीवर सादरीकरण करावे अशी तुमची इच्छा असल्यास किंवा अशी सादरीकरणे देण्याचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा असल्यास, जनजागृतीचे पोस्टर, व्हिडिओ बनवण्यात आम्हाला मदत करू शकत असल्यास कृपया आम्हाला ईमेल करा: powerfulgyaan@gmail.com
तुमच्या WhatsApp वर मोहिमेच्या सर्व ऑडिओ कथा आणि व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी, फक्त तुमच्या नावासह 8149363854 वर एक संदेश पाठवा.
एकत्रितपणे आपण व्यसनमुक्त, निरोगी, सुदृढ आणि सशक्त समाज घडवू शकतो.