top of page
Useful Websites.jpg

ही वेबसाईट दारूमुळे होणारे नुकसान व दारूमुळे होणाऱ्या नुकसानाचे ओझे कमी करण्यासंदर्भातील जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसींचा सारांश देते. जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्वाच्या प्रकाशनांच्या लिंक्स देखील उपलब्ध आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या दारूवरील सर्व संसाधनांची अधिक तपशीलवार यादी, कोविडवर दारू पिण्याच्या परिणामाबाबत जारी केलेल्या स्पष्टीकरण या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ही एक शैक्षणिक मोहीम आहे जिचा उद्देश पश्चिम ऑस्ट्रेलियातील मद्यपानाची संस्कृती बदलण्याचा आहे. यांच्यामार्फत राबवण्यात आलेल्या सर्व मोहिमांची सामग्री या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दारूच्या दुष्परिणामांवरील लेख आणि वैयक्तिक, सामाजिक पातळीवर करायच्या उपाययोजनांची माहिती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. 

​ड्राय जानेवारी ही यूके मधील एक यशस्वी सार्वजनिक मोहीम आहे जी लोकांना एका महिन्यासाठी दारूमुक्त राहण्याचा प्रयत्न करण्यास आणि स्वतःसाठी फायदे अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करते. हे एक महिन्याचे आव्हान स्वीकारण्यास तयार असलेला कोणीही या वेबसाईटवरील माहितीचा उपयोग करू शकतो.

हे अल्पवयीन मद्यपानाच्या धोक्यांबद्दल वैज्ञानिक माहिती देते. तसेच पालक आपल्या मुलांना मद्यपान करण्यापासून रोखण्यासाठी वापरू शकणाऱ्या 4 सोप्या मार्गांबद्दल माहिती दिलेली आहे.

SPYM ही देशव्यापी नेटवर्क असलेली एक राष्ट्रीय संस्था आहे, जी गेल्या ३ दशकांपासून व्यसनाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सामाजिक एकत्रीकरणाच्या क्षेत्रात काम करत आहे. ते समाजातील वंचित घटकांना मोफत सेवा देतात आणि इतर स्वयंसेवी संस्थांनाही प्रशिक्षण देतात. त्यांच्या वेबसाइटवर हिंदीमध्ये क्रियाकलाप-आधारित जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या व्हिडिओंसह अनेक उपयुक्त संसाधने आढळू शकतात.

ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या जवळील अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे केंद्र शोधण्यात मदत करेल. दारूचे व्यसन लागलेल्या लोकांना दारू सोडण्यासाठी इतरांकडून मोफत मदत केली जाते. या समस्येचा सामना कसा करायचा यासाठी त्यांचे कुटुंबीयही तिथे जाऊन मदत घेऊ शकतात.

मोवेंडी ही आंतरराष्ट्रीय सदस्यत्व असलेली 170 वर्षे जुनी संस्था आहे. ते दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त असलेल्या सुरक्षित आणि सामाजिक न्यायावर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी समुदाय पातळीवर काम करतात. त्यांच्या वेबसाइटवर ही समस्या तपशीलवार समजून घेण्यासाठी आणि त्याबद्दल काय करता येईल यासाठी भरपूर माहिती आहे.

दारू वापरण्याचे आरोग्यावरील विविध प्रकारचे दुष्परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी उपयुक्त माहितीचा एक अतिशय प्रामाणिक स्रोत.

अल्पवयीन मद्यपान टाळण्यासाठी मुलांशी संभाषण करण्याच्यादृष्टीने पालक आणि काळजीवाहकांसाठी संसाधने.

दारूचे दुष्परिणाम समजून घेण्यास मदत करणारे लेख आणि ब्लॉग आहेत, मद्यपान थांबवल्यास काय होते आणि दारूचा वापर कसा सोडावा याबद्दल दिशानिर्देश प्रदान करतात.

bottom of page