top of page
Useful Articles & Documents.jpg

यादृच्छिक नियंत्रित अभ्यास म्हणून या कार्यक्रमाचे मूल्यमापन केले गेले आहे. एका वर्षानंतर, अनप्लग्ड शालेय अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिगारेट ओढण्याची किंवा दारूच्या नशेत असण्याची शक्यता 30% कमी होती.

दारूच्या वापराचे प्रमाण आणि जगभरातील विविध दारू-संबंधित नुकसानाची खात्रीलायक माहिती देते. दारूनियंत्रणाच्या पुढील प्रगतीसाठी ज्या धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे त्याबद्दल देखील माहिती देते.

जे लोक मद्यपान करत नाहीत (मद्यपींच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी, अनोळखी व्यक्ती) त्यांना मद्यसेवनामुळे कसे नुकसान होते याविषयी पुस्तक अंतर्दृष्टी देते. हे पुस्तक 9 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांवर आधारित आहे.

Jernigan DH यांचा हा लेख. दारू उद्योगाने दारूसंबंधी धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि दारूच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी 'इंटरनॅशनल सेंटर ऑन अल्कोहोल पॉलिसी' ही संस्था कशी सुरू केली याचे वर्णन केले आहे. जबाबदारीने दारू पिण्यास सांगून दारू आणि दारू उद्योगांच्या जाहिरातींचा दोष दारूच्या वापरकर्त्यांवर टाकण्याचा प्रयत्न ही संस्था कशाप्रकारे करत आहे याबद्दल लिहले आहे.

आईसलँडने मुलांना आरोग्यदायी मनोरंजनाचे मार्ग प्रदान करण्यावर आणि पालकांना मुलांसोबत अधिक वेळ घालवण्यास प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक अनोखा प्रतिबंधक कार्यक्रम कसा राबवला आहे हे या लेखात मनोरंजक पद्धतीने मांडले आहे. 1998 ते 2016 या काळात, गेल्या महिन्यात मद्यपान केलेल्या 15-16 वर्षांच्या आइसलँडिक तरुणांची टक्केवारी 42% वरून 5% पर्यंत घसरली; दैनंदिन सिगारेट ओढण्याचे प्रमाण 23% वरून 3% पर्यंत घसरले आणि भांग वापरण्याचे प्रमाण 17% वरून 6% पर्यंत घसरले.

कोव्हीड १९ सारख्या साथींमध्ये एक पूर्ण महिना दारू न पिता कसे राहू शकाल याबाबत मार्गदर्शन केले आहे.

वेगवेगळ्या वयोगटातील मुलांशी दारूविषयी बोलण्यासाठी त्यांच्या पालकांना मार्गदर्शक: वय 4-7, वय 8-11 आणि वय 12-17.

डॉक्टर, मानसिक आरोग्य उपचार व्यावसायिक आणि निमआरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती या वेबसाईट वर उपलब्ध आहे, जी त्यांना दारूचे व्यसन असलेल्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास मदत करू शकते.

व्यसन, व्यसनावर उपचार आणि व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या लोकांबद्दल माहिती देते.

पुस्तकात दारू का पिऊ नये याची 10 कारणे दिली आहेत आणि दारूमुळे होणाऱ्या हानीचे तपशीलवार वर्णन केले आहे.

या ऍक्टिव्हिटी तुमच्या विद्यार्थ्यांना दारूचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक दुष्परिणाम समजून घेण्यास मदत करू शकतात. 

हा लेख आश्चर्यकारकपणे स्पष्ट करतो की अल्कोहोल पिण्यामुळे तणावाचे विविध परिणाम कसे बिघडतात आणि काही आश्चर्यकारक पर्यायी मार्गांची चर्चा केली आहे ज्यामुळे आम्हाला आराम करण्यास आणि कठीण प्रसंगांना तोंड देण्यास मदत होऊ शकते. 

bottom of page