मेरी प्यारी जिंदगी या मोहिमेअंतर्गत आम्ही ऑडिओ कथा, व्हिडिओ आणि मीम्सच्या मालिकेद्वारे समाजासमोर दारूचे विदारक वास्तव मनोरंजक पद्धतीने घेऊन येत आहोत. दारूसारख्या नशेच्या पदार्थाला हात का लावू नये हे तरुणांना समजावून सांगणे आणि आधीच व्यसन जडलेल्यांना ते कसे सोडायचे याचे मार्गदर्शन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम जागतिक आरोग्य संघटना - दक्षिणपूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालय आणि प्रसिद्ध कथाकार श्री. नीलेश मिश्रा यांच्या निर्मितीक्षम चमूचा एकत्रित प्रयत्न आहे.
कृपया या मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध झालेले साहित्य तुम्ही स्वत: अभ्यासावे, तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करून तुमचे योगदान द्यावे ही नम्र विनंती.
ऑडिओ कथा
भारतातील प्रसिद्ध कथाकार श्री. नीलेश मिश्रा यांच्या आवाजातील १५ ऑडिओ कथांची ही मालिका आहे. या कथा तुम्ही प्रवासात किंवा इतर कोणत्याही वेळी ऐकू शकता. ७ ते ८ मिनिटांच्या या कथा आहेत.
व्हिडिओ
दारूमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या विविध पैलूंवर चर्चा तसेच व्यसनमुक्तीच्या विविध मार्गांबाबत माहिती देणारे १० लहान व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध करणार आहोत.
मीम्स
खालील काही नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक मीम्स आहेत: