top of page
Search

पालक आपल्या मुलांशी या विषयावर कशा प्रकारे चर्चा करू शकतात ?


पालकत्व हे खरोखरच एक मोठे आव्हान आहे. पाल्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य व त्यांना शिस्त लावणे, यात योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे. एखाद्याने प्रेमळ असणे आवश्यक असतानाच महत्वाच्या गोष्टींवर कठोर सुद्धा असणे आवश्यक आहे.


समवयस्क मित्रांच्या वाढत्या दबावाला बळी न पडता आपल्या मुलांनी व्यसनरूपी विषापासून का म्हणून दूर राहावे हे पाल्यांना पटवून देणे पालकांसाठी कठीण होऊ शकते | येथे काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत ज्यामुळे हे कठीण काम सोपे होईल |


1) विशिष्ट वयात मुले दारू पिण्याचा अनुभव घेऊन पाहतात | असे काही घडण्यापूर्वीच या विषयावर मुलांशी संवाद सुरू करा | एकदा का त्यांनी दारू घ्यायला सुरुवात केली किंवा दारू संबंधित जाहिराती आणि समवयस्कांचे विचार ऐकले की मग ते इतरांचे कमी ऐकतात |


2) अधूनमधून या विषयावर चर्चा करा | दारू व्यवसायिक दारू कशी चांगली आहे हे सातत्याने युवांवर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असतात | त्यामुळे केवळ एकदाच संवाद साधून मुलांवर त्याचा प्रभाव पडेल अशी शक्यता खूप कमी आहे |


3) त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा आणि त्यांच्या शंकांचे निरसन करा | जेव्हा आसपासच्या मित्रांचा त्यांच्यावर दारू पिण्यासाठी प्रचंड दबाव असतो, अशा वेळी मुलांनी आपल्या सूचनांचे आंधळेपणाने पालन करावे अशी अपेक्षा बरोबर नाही | हे व्यसनरूपी विष घेणे आवश्यक असल्याचे त्यांचे मित्र आणि ते स्वतःला समजावत असतात | अशा वेळी त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यास तयार रहा | उदाहरण द्यायचे झाल्यास "ताण-तणावाचा सामना करण्यासाठी अधून मधून घेण्यास कुठला धोका आहे?", असा एक सर्वसामान्य आक्षेप किशोरवयीन मुलांचा असतो | अशा प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे देऊन त्यांचे गैरसमज दूर करा:

  • दारू किंवा कोणताही व्यसनाधीन पदार्थ घेतल्याने तुम्ही तुमचा ताण काही काळ विसरू शकता | पण यामुळे प्रश्न सुटत नाही | तो तसाच राहतो | तणाव विसरल्यामुळे तो कसा कमी होईल याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि उलट ताण वाढतच जातो | तसेच, दारू पिण्याच्या नकारात्मक परिणामांमुळे जीवनात नवीन तणाव निर्माण होत राहतात |

उदा. ब्रेक अप चे दुःख विसरण्यासाठी दारू पिणारा मुलगा त्यापासून होणारे नुकसान योग्य प्रकारे हाताळू शकत नाही आणि दुःख व्यक्त करण्यास खूप वेळ घालवतो | सोबतच आपले आयुष्य व्यसनात बुडवून ते स्वतःची कार्यक्षमता कमी करतानाच दुसरी गर्लफ्रेंड शोधण्याची क्षमताही कमी करतात | तुलनेत रडून, ओरडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणारे दुःख लवकर विसरतात | दरवर्षी हजारो तरुण तरुणी ब्रेकअप ला सामोरे जातात आणि त्यातून बाहेरही पडतात | पण यासाठी जे दारूची मदत घेतात त्यांना यातून बाहेर पडण्यास तुलनेत जास्त वेळ लागतो |

  • खेळ, संगीत, नृत्य, ध्यानधारणा, व्यायाम, चित्रकला, मित्रांसोबत वेळ घालवणे, ट्रेकसाठी जाणे इत्यादी तणाव कमी आणि नियंत्रित करण्याचे चांगले मार्ग आहेत | जेव्हा एखादी व्यक्ती तणावातून बाहेर पडण्यासाठी दारूची मदत घेते तेव्हा ती स्वतःला दुःखी करून दीर्घकाळ पश्चाताप करून घेते | परंतु एखादी व्यक्ती यासाठी जेव्हा नियोजनबद्ध नियमावली विकसित करते ती तुलनेत जीवनात अधिक साध्य करते आणि आनंदी होते | आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एखाद्याला दारू किंवा तंबाखूच्या आधाराची गरज असणे खरोखरच समजदारीचे लक्षण आहे का ?

  • आपण जेव्हा स्वतःला हतबल समजतो तेव्हा सर्वांनाच कठीण काळातून जावे लागते | अशा वेळी स्वतःला दारूच्या स्वाधीन करण्यापेक्षा समुपदेशकाची मदत घेतल्यास अधिक चांगली मदत होते | पालक म्हणून तुम्ही मुलांना आश्वस्थ करू शकता की ज्या समस्यांना ते तोंड देत आहेत त्या तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतात | त्यांना वचन देऊ शकता की तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि निर्णायक न होता तोडगा काढण्यात मदत कराल |

  • वर पहिल्या मुद्दयात स्पष्ट केल्याप्रमाणे बहुतेक लोकांना प्रसंगानुरूप नियंत्रित प्रमाणात प्यावीशी वाटते | पण ताबा मिळवणे (व्यसनीहोणे) हाच दारूचा गुणधर्म असल्याने अनेक जण योग्य प्रमाण आणि नियंत्रण दोन्हीही गमावून बसतात |


4) पाल्यांच्या शंकांचे प्रभावी समाधान करण्यास सक्षम होण्यासाठी स्वतःला चांगले शिक्षित करा | या विषयावर बरीच ऑनलाईन पुस्तके व संसाधने उपलब्ध आहेत | काही ऑनलाईन संसाधनांचा उल्लेख खाली दिला आहे |

  • दारूचावापर - धोकादायक - लोकांना सक्षम करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) मद्य आणि विविध संसाधनांवरील आकडेवारी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • NIAAA - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑनअल्कोहोल अॅब्यूज अँड अल्कोहोलिझम, यूएसए या संकेतस्थळावर बरीच उपयुक्त माहिती उपलब्ध आहे |

  • पालकांचे सबलीकरण - सशक्त पालक मोहीम संकेतस्थळ.

  • लहान मुलांशी दारूसंबंधी बोलण्याची कला - वयानुसार मुलांसोबत कुठली चर्चा केली जाऊ शकते याबाबत या लेखात चर्चा करण्यात आली आहे |

  • तुम्ही दारू का पिऊ नये ? - दारू का पिऊ नये या संदर्भातील १० कारणांबाबत या छोट्याशा लेखात चर्चा करण्यात आली आहे |


5) मित्र दारू पिण्यासाठी दबाव टाकतात तेव्हा नम्रपणे व ठामपणे कसा नकार द्यावा याचा नमुना दाखवा आणि त्यांची जोरदार तयारी करून घ्या | असा प्रसंग आल्यास काय सांगायचे हे त्यांनी आधीच ठरवले असेल तर ते आत्मविश्वासाने सांगू शकतील | पुढे काही विधाने दिली आहेत |


  • नाही, धन्यवाद. मी दारू पित नाही.

  • नाही, धन्यवाद. मी शुद्धीत राहून जीवनाचा आनंद घेण्यावर आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्यावर विश्वास ठेवतो.

  • नाही, धन्यवाद. मी माझ्या पालकांना वचन दिले आहे की मी कधीच दारू पिणार नाही आणि मी माझ्या आईवडिलांना दिलेलं वचन तोडू नाही शकत |


6) स्पष्ट नियम ठरवून देण्यास अजिबात संकोच करू नका | जीवनात यशस्वी होण्यासाठी काही प्रमाणात शिस्त आवश्यक आहे आणि मुले किशोर वयात येईपर्यंत त्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी ही पालकांची असते | व्यवस्थित स्पष्टीकरण दिल्यास परकेपणाची शक्यता कमी होते | तसेच किशोरवयीन मुलांसोबत मौज मजा करण्यासाठी काही वेळ काढून ठेवा |


7) मनोरंजनासाठी ते योग्य मार्गाचा अवलंब करीत असल्याची खात्री करा | एखादी व्यक्ती चांगल्या मार्गाने देखील मजा करू शकते आणि हा मार्ग प्रत्यक्षात जास्त आनंदी, निरोगी आणि यशस्वी होतो यावरही चर्चा करणे महत्वाचे आहे |


8) पालकांनी जागरूक राहून अल्पवयीन मद्यपान किती धोक्याचे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे | यासंदर्भात काही माहिती:


  • संशोधन सांगते की ज्या मुलांनी १५ वर्षे पूर्ण होण्याआधीच मद्यपान करण्यास सुरुवात केली त्यांची मद्यपानावर अवलंबून राहण्याची शक्यता ही ४० टक्के होती, याउलट ज्यांनी २० व्या वर्षांपासून किंवा त्यानंतर मद्यपान करण्यास सुरुवात केली त्यांचा दारूवर अवलंबून राहण्याचा धोका हा केवळ १० टक्के होता |

  • अल्पवयात मद्यपान केल्यास किशोरवयीन मुलांच्या मेंदूला दीर्घकालीन हानी पोहचून स्मरणशक्ती, ग्रहणक्षमता, निर्णयक्षमता व आवेगावर नियंत्रण येऊ शकते | यामुळे शैक्षणिक श्रेणी आणि व्यावसायिक कामगिरीचा दर्जा ढासळतो |

  • किशोरवयीन मुलांनी मद्यपानास सुरुवात केल्यास नैराश्य, आत्महत्या, अती मद्यपान, नशेत वाहन चालविणे, हिंसा अशा प्रकारचे चुकीचे वर्तन वाढत जाते |

9) उदाहरण द्यायचे झाल्यास, मुले जे ऐकतात त्या तुलनेत ते जे पाहतात त्याचा जास्त अवलंब करण्याची शक्यता असते | त्यामुळे तुम्ही स्वतःहून दारू न पिल्यास खूप मदत होते | पण आपण दारू पित असल्यास आणि स्वतःहुन सोडू शकत नसल्यास तज्ञांची मदत घेऊ शकता | जरी आपण लगेच सोडू शकत नसाल तरी असे म्हणू शकता की मी या जाळ्यात अडकलेलो आहे पण त्याने/तिने या जाळ्यात अजिबात अडकू नये |

Comments


bottom of page