top of page
Search

प्रियजनांना न दुखवता त्यांना व्यसन सोडण्यास प्रवृत्त कसे करावे



तुम्ही जवळच्या व्यक्तींबद्दल प्रेम आणि चिंता व्यक्त करता, पण टीका केली तर ते दुखावले जातात.


तो/ती पीडित आहे अपराधी नाही हे समजून घ्या


दारू/तंबाखूचे व्यसन करणारा तुमचे ऐकण्यास विरोध करतो आणि व्यसन सोडण्याच्या तुमच्या विनंतीचा त्याला राग येतो कारण तुम्ही टीका करता असे त्याला वाटते | त्यामुळे तुमच्या स्वरात आदर, प्रेमभाव, कळकळ आणि समजदारपणा आहे याची आधी खात्री करा | आधी मनं जुळली असतील तर आपण जे काही बोललो त्याचा गैरसमज होणार नाही | तुम्हाला माहिती आहे की ती व्यक्ती चांगली आहे | समस्या ही त्या व्यक्तीच्या दारू सेवनाबाबत आहे, त्याच्याशी नाही असे समजून तुम्ही त्या व्यक्तीशी संवाद साधला तर तुम्हाला समजेल की त्यालाही दारू सोडायचीच आहे पण त्याला ते अद्याप शक्य झालेले नाही, तरच तो तुमचं ऐकेल |


तुम्ही असे म्हणू शकता की, “मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा देतो | मला तुझी खूप काळजी वाटते कारण दारू पिऊन अनेकांचे आयुष्य उद्धवस्थ होताना मी पहिले आहे | मला जाणवतंय की तु खूप छान व्यक्ती आहेस, पण ही दारू खूप वाईट आहे | एका डॉक्टरांनी मला सांगितले की जर एखादी व्यक्ती दररोज दारू किंवा तंबाखूचे सेवन करीत असेल त्याचे कुटुंब त्याला अपेक्षेपेक्षा १० वर्षे आधी गमावून बसण्याची शक्यता असते | मी तुला लवकर गमावू इच्छित नाही | त्यामुळे प्लीज हे सोडण्याचा प्रयत्न कर”


आशा ठेवा – दारू सोडणे शक्य आहे


एखादी व्यक्ती दारू सोडण्यासाठी आता इच्छुक नाही कारण त्याने/तिने सोडण्यासाठी आजवर डझनावार प्रयत्न केले आहेत पण त्याला अपयश आले आणि त्याला/तिला पुन्हा अपयशी व्हायचे नाही | म्हणून हे महत्वाचे आहे:

  1. त्याचा आत्मविश्वास वाढवा – त्याने यापूर्वी जे साध्य केलय, मिळवलय त्याची त्याला सातत्याने आठवण करून देत रहा | ‘ठरवलेली प्रत्येक गोष्ट करण्याची तुझ्यात क्षमता आहे, दारू/तंबाखू सोडण्याची सुद्धा’, असा त्याला विश्वास द्या |

  2. ते शक्य आहे असे ठामपणे सांगा – जरी कठीण असलं तरी दररोज हजारो लोक दारू सोडतात, त्यामुळे यासाठी तो सक्षम नसल्याचे कुठलेच कारण नाही |

  3. त्याला कळू द्या की नशेच्या गर्तेत जाण्याची लक्षणे आठवड्यातून केवळ तीन दिवस असतात पण सोडण्याचे फायदे कायम त्याच्यासोबत राहतात |

  4. त्याला कळू द्या, मदत उपलब्ध आहे – त्याला कळू द्या की तज्ञांची मदत सहज घेता येते ज्यामुळे सोडणे सोपे जाते | अशी औषधी उपलब्ध आहे जी नशेच्या गर्तेत जाण्याची लक्षणे कमी करतात | तल्लफ आल्यावर ती नियंत्रित करण्याच्या पद्धतींवर चर्चा करा | त्याला सांगा की समुपदेशकाशी संवाद साधल्यावर दारूची तल्लफच नाही तर जीवनातील ताणतणाव कमी होण्यासही मदत झाली आहे | तो/ती ‘अल्कोहोलिक एनोनिम्स (Alcoholic Anonymous) ची देखील मदत घेऊ शकते |

जेव्हा त्याला असं वाटेल की तो हे करू शकतो आणि त्याच्यासाठी मदत उपलब्ध आहे तेव्हा तो प्रयत्न करण्याचा अधिक विचार करेल | व्यसन सोडण्यासाठी तुमच्या जवळपास कुठे मदत मिळेल हे जाणून घेण्यासाठी Resource विभागात ‘सोडण्यासाठी मदत’ (Help to Quit) हा भाग पहा |


हा प्रवास कठीण आहे आणि त्याला/तिला प्रोत्साहनाची बरीच गरज आहे


काही वेळा पडल्याशिवाय कुणीच सायकल चालवायला शिकत नाही | त्याचप्रमाणे बहुतेक लोक जे व्यसन सोडण्यात यशस्वी झाले आहेत ते सुरूवातीला काही वेळा अपयशी ठरले आहेत | अशा वेळी तुम्ही टोमणे मारल्यास फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होईल | आपण केलेल्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याने त्यांना स्वतःच्या अनुभवातून शिकण्यासाठी प्रोत्साहित करतानाच त्यांना आश्वस्त करा की ते प्रयत्न करीत राहतील आणि त्याच चुका पुन्हा करणार नाहीत |


जीवनाच्या इतर पैलूंशी संबंधित सकारात्मक संवाद सुरू ठेवा


तो/ती व्यसन सोडत नाही तोपर्यंत अधून मधून विनंती करीत रहा, पण दररोज नाही | चर्चेचे इतर विषय आणि संयुक्त उपक्रमही सुरू ठेवा तुमच्या नात्यातील ओलावा कायम राहील | त्याने व्यसन सोडले नसेल तरीही जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी आदराने व समजूतदारपणाने वागत असाल तर तुमच्या विनंतीला मान ठेवून तो तुमच्यापासून दूर जाणार नाही | खरे तर अशावेळी तो तुमची जास्त किंमत करेल कारण त्याला माहिती आहे की, तुम्ही त्याची खरोखरच खूप काळजी करता |

bottom of page